Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्‍यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 15:4
20 Iomraidhean Croise  

नबुखद्नेस्सर राजाने त्याला देवाची शपथ वाहायला लावली होती; त्याच्याविरुद्धही त्याने बंड केले; त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.


राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती; मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे.


हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल; मी वाइटाशी परिचय ठेवणार नाही.


देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.


तुझे भय धरणार्‍या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्‍यांचा, मी सोबती आहे.


पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे.


‘खोटी शपथ वाहू नकोस तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खर्‍या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे.


तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”


तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ त्यांनी जहाजावर भरले.


आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो.


तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, “हाय! हाय! मुली, तू माझे मन खचवले आहेस; तू माझ्यावर मोठे संकट आणले आहेस; परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan