Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 148:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अग्नी, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 148:8
24 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला;


ते त्याच्या सूत्राने चोहोकडे फिरतात; म्हणजे अर्थात त्यांना आज्ञापिलेले कार्य ते अखिल भूपृष्ठावर करतात;


अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.


त्याच्यापुढील तेजाने घनमेघांमधून गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.


मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्‍याबरोबर टोळ आले.


तेव्हा परमेश्वराने पश्‍चिमेचा प्रचंड वारा वाहवला; त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले; मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही.


मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली.


कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल.


मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन.


तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले.


कारण जो पर्वत निर्माण करतो, वारा उत्पन्न करतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत ह्याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालतो त्याचे नाम परमेश्वर, सेनाधीश देव, हे आहे.”


प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलावले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकला व भूमीही तो खाऊन टाकणार होता.


तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले.


खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले; मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता.


मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्‍या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.


सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan