Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 146:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते; त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 146:4
17 Iomraidhean Croise  

मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.


तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”


पाहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल;


पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो; मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे असतो?


त्याच्या पुत्रांची उन्नती होते ती त्याला कळत नाही; त्यांची अवनती होते ती त्याला दिसत नाही.


“माझा प्राणनाश होत आहे. माझे दिवस संपले आहेत; मला कबर काय ती राहिली आहे.


माझे दिवस आटोपले आहेत; माझे मनोरथ, माझ्या मनातले विचार, निष्फळ झाले आहेत.


(अद्यापि माझा श्वासोच्छ्वास बरोबर चालत आहे, देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे;)


तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात.


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.


तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस, आणि म्हणतोस, “अहो मानवांनो, परत जा.”


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.


मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?


परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो; पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही, आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan