Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 143:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 वैरी माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहे; त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळी मृत झालेल्यांप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहण्यास लावले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 माझ्या शत्रूने पाठलाग करून मला पकडले आहे; त्याने मला जमिनीवर तुडविले आहे; जसे दीर्घकाळाच्या मृतास ठेवावे, तसे त्याने मला अंधारात जखडून ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 143:3
14 Iomraidhean Croise  

यबावाने त्या खबर देणार्‍या माणसाला म्हटले, “तू त्याला तसे पाहून तेथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा शेकेल रुपे व कमरबंद दिला असता.”


अबनेर पुन्हा असाएलाला म्हणाला, “माझा पाठलाग करण्याचे सोडून दे; तुला मारून मी जमिनीवर का पाडावे? मग तुझा भाऊ यवाब ह्याला मी आपले तोंड कसे दाखवू?”


माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत.


माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.


कारण परकीय1 लोक माझ्यावर उठले आहेत; दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात; त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही.


तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो, आणि माझा गौरव धुळीस मिळवो. (सेला)


हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;


जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवतो.


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’


अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan