Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 142:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पाहा, मला ओळखणारा कोणी नाही; मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची पर्वा करणारा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही; माझी कोणालाही पर्वा नाही. मला काहीच आश्रय नाही; माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 142:4
19 Iomraidhean Croise  

दुष्टांचे डोळे थकतील; त्यांना कोणतेही शरणस्थान राहणार नाही; प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल.”


कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.


मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.


त्यांनी माझ्यासाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्म्यांच्या सापळ्यांपासून मला राख.


माझा आत्मा माझ्या ठायी व्याकूळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.


माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदानालस्ती होत आहे; माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांत माझी फार निर्भर्त्सना होत आहे; माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे; मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात.


निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.


तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत, माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे.


तू माझ्या परिचितांना माझ्यापासून दूर केले आहेस, त्यांना माझा वीट येईल असे तू मला केले आहेस; मी कोंडलेला आहे, माझ्याने बाहेर निघवत नाही.


तू त्यांच्यावर एकाएकी सैन्य आणशील तेव्हा त्यांच्या घरांतून आक्रोश कानी पडो; कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडले आहेत.


मेंढपाळांना पळायला मार्ग राहणार नाही, कळपांचे प्रमुख निभावणार नाहीत.


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात;


पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.


माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो.


दावीद आपल्या मनात म्हणाला, “मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच तर पलिष्ट्यांच्या देशात पळून जावे ह्यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही; अशाने शौल माझ्यासंबंधाने निराश होऊन इस्राएल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा ह्यापुढे शोध करणार नाही; ह्याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan