Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 142:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी त्याच्यापुढे आपले गार्‍हाणे मांडतो; मी आपले संकट त्याला सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे, आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 142:2
10 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस; तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणार्‍यांसारखी माझी गती होईल.


लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.


अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)


हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्‍गत तुला कळवले.


तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan