Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 142:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो; आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 142:1
12 Iomraidhean Croise  

याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा : “तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.


हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे.


मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभार्‍याकडे हात वर करतो; तेव्हा माझी दीन वाणी ऐक.


हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला; परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो,


ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!


हे देवा, तू आपल्या नावाने मला तार; आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर;


हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.


त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.


वाटेने जाताना तो एका मेंढवाड्याजवळ आला, तेथे एक गुहा होती; तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला. गुहेच्या अगदी आतल्या बाजूला दावीद व त्याचे लोक बसले होते.


तेव्हा दाविदाला त्याचे लोक म्हणाले, “परमेश्वराने आपणाला सांगितले होते की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर; हे घडून येण्याचा दिवस हाच आहे.” तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan