Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 141:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या, जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 141:1
10 Iomraidhean Croise  

तू माझा अपराध का क्षमा करत नाहीस? माझ्या ठायीचा दोष का घालवत नाहीस? आता तर मी धुळीत पडून राहणार तू माझा पुष्कळ शोध करशील पण मी नसणार.”


हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे; तू आपल्या सत्यतेने व न्याय्यत्वाने माझे ऐक.


हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्‍यांसारखा होईन.


तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.


मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभार्‍याकडे हात वर करतो; तेव्हा माझी दीन वाणी ऐक.


हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.


जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.


मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर; माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे परमेश्वरा, विलंब लावू नकोस.


हे देवा, माझ्यापासून दूर असू नकोस; हे माझ्या देवा, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan