Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 140:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात त्यांच्या ओठाखाली नागांचे विष आहे. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 140:3
18 Iomraidhean Croise  

परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.”


माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.


त्यांच्या ठायी सर्पाच्या विषासारखे विष असते; जो बहिरा जोगी साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे ते आहेत;


पाहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्‍गार काढतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवारीच आहेत; कारण, “ऐकतो कोण?” असे ते म्हणतात;


कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.


शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो.


त्याच्या मनात उद्दामपणा असतो; तो दुष्कर्माची योजना करीत असतो; तो वैमनस्य पसरवतो.


नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


जो तो आपल्या शेजार्‍याला फसवतो; ते सत्य म्हणून बोलत नाहीत; त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे, ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवतात.


माझ्यावर उठणार्‍यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा माझ्याविषयीचा कट तू ऐकला आहेस.


अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan