Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 14:4
23 Iomraidhean Croise  

सर्वसमर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी? त्याची विनवणी करून आम्हांला लाभ तो काय?’


तो सर्वसमर्थाच्या ठायी आनंद पावेल काय? तो सर्व प्रसंगी देवाचा धावा करील काय?


दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले.


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझे नाव घेऊन धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपल्या क्रोधाचा मारा कर.


त्यांना माहिती नाही व कळतही नाही; ते अंधारात इकडेतिकडे फिरतात; पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत.


पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत; त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत, आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे.


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस.


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबाला ग्रासून टाकले आहे, त्याला खाऊन टाकले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.


ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात; ते आपल्या अधिपतींना गिळून टाकतात; त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत; त्यांच्यातला कोणी माझा धावा करीत नाही.


जे तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आ पसरता व देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका :


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan