Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 14:3
25 Iomraidhean Croise  

देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.


अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही.


तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा!


हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.


मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही.


तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही.


माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे.


मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात; ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात.


रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसरी लोक जागे झाले; आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते.


परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावर आलेले गोमाश्यांचे थवे त्याने दूर केले; एकही गोमाशी राहिली नाही.


सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.


पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.


आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;


तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुमच्यामध्ये नाही, असे आहे की काय?


तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2


त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.


‘जो उत्तम देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे मी शपथपूर्वक वचन दिले होते, तो देश ह्या दुष्ट पिढीतील माणसांपैकी एकाच्याही दृष्टीस पडणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan