Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 139:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तुझा द्वेष करणार्‍यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणार्‍यांचा मला वीट का येऊ नये?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याहवेह, तुमचा द्वेष करणार्‍यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्‍यांचा मी तिरस्कार करू नये काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 139:21
12 Iomraidhean Croise  

तेव्हा हनानी द्रष्ट्याचा पुत्र येहू हा यहोशाफाट राजाला सामोरा जाऊन म्हणाला, “तू दुष्टांचे साहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यावर प्रीती करावी काय? ह्यामुळे परमेश्वराचा तुझ्यावर कोप भडकला आहे.


लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.


विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत.


अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्‍यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,


दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही.


निरर्थक मूर्तीला भजणार्‍यांचा मी द्वेष करतो; माझा भाव तर परमेश्वरावर आहे.


पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला,


‘तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले.


तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan