Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 139:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 139:2
17 Iomraidhean Croise  

तिच्याशी बोलणार्‍या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले; ती म्हणाली, “मला पाहणार्‍याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय?”


तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरचा संताप मला ठाऊक आहे.


त्याच्या एका सेवकाने त्याला सांगितले, “माझे स्वामीराज, असा कोणी नाही; पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्राएलातला संदेष्टा अलीशा हा इस्राएलाच्या राजाला कळवतो.”


तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात.


माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत; माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?


मानवाचे विचार वायफळ आहेत हे परमेश्वर जाणतो.


परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.


तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरला संताप मला ठाऊक आहे.


तेव्हा परमेश्वराचा आत्मा माझ्यावर उतरला; तो म्हणाला, “असे म्हण : परमेश्वर म्हणतो, अहो इस्राएल वंशजहो, तुम्ही असे असे म्हटले; तुमच्या मनात काय काय येत आहे ते मी जाणतो.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्राएलाचे संदेष्टे त्यांच्या द्वारे पुरातन काळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्षे त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की, मी तुला त्यांच्यावर चाल करण्यास आणीन, तो तूच ना?


तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते सात डोळे जरूब्बाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.”


येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता?


येशूने त्यांच्या अंत:करणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले;


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवल्यावर हे गीत त्यांच्यासमोर साक्ष देईल, कारण ते त्यांच्या संतानाच्या मुखी सदोदित राहील. ज्या देशात त्यांना घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली होती त्यात त्यांना अजून नेलेही नाही तोच त्यांच्या मनात काय काय चालले आहे हे मी जाणून आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan