Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 133:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सीयोन डोंगरावर उतरणार्‍या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 133:3
22 Iomraidhean Croise  

जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.


त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले; तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस.


तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो; तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस.


तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन.


राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.


पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल.


जसे परमेश्वरापासून दहिवर येते व जसा गवतावर पाऊस पडतो आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही, किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकांत पसरतील.


परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.


शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत;


अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे राज्य करावे.


कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.


तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल.


त्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सिर्योन म्हणजे हर्मोन पर्वतापर्यंत,


गिलाद, तसेच गशूरी व माकाथी ह्यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलकापर्यंतचा सर्व बाशान,


हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.


ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan