Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 नाहीतर “मी ह्याला जिंकले” असे माझा वैरी म्हणेल; आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्लासतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,” आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 13:4
17 Iomraidhean Croise  

सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर ह्याने आमच्यावर अनुग्रह केला आहे; आमच्यातले थोडके लोक वाचवून अवशेष ठेवले आहेत आणि आम्हांला त्याच्या पवित्रस्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे; आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हांला थोडेसे नवजीवन मिळाले आहे.


तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही.”


तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.


हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्‍यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस;


माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत;


“अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत.


मी म्हणालो, “तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील.”


तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.


तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे; मी सहसा ढळणार नाही.


तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.


हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस; राष्ट्रांचा न्यायनिवाडा, तुझ्यापुढे होऊ दे.


मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही.


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”


कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील; तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan