Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा, मला उत्तर दे; मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 13:3
15 Iomraidhean Croise  

सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर ह्याने आमच्यावर अनुग्रह केला आहे; आमच्यातले थोडके लोक वाचवून अवशेष ठेवले आहेत आणि आम्हांला त्याच्या पवित्रस्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे; आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हांला थोडेसे नवजीवन मिळाले आहे.


माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.


तू माझा दीप उजळतोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो.


माझे वैरी पाहा, ते फार झाले आहेत; ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात.


मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहेस; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत.


हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.


हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्‍या, माझा द्वेष करणार्‍यांपासून मला झालेली पीडा पाहा;


ते घामाघूम झाले म्हणजे मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करीन, त्यांना मस्त करीन, म्हणजे त्यांना हर्षभ्रम होऊन ते कायमचे निद्रावश होतील, उठायचे नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती, आणि त्याचे वीर ह्यांना मस्त करीन; ते कायमचे निद्रावश होतील, ते उठायचे नाहीत, असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो.


हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा.


ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.


आपल्या बापाने लोकांना शपथ घालून मनाई केली होती हे योनाथानाला ठाऊक नव्हते; म्हणून त्याने आपल्या हातात असलेल्या काठीचे टोक पुढे करून मधाच्या पोळ्यात खुपसले, आणि मध हातात घेऊन तोंडाशी नेला; तेव्हा त्याचे डोळे टवटवीत झाले.


योनाथान म्हणाला, “माझ्या बापाने देश कष्टी करून सोडला आहे; मी हा मध थोडासा चाखला तोच माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत पाहा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan