Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 13:2
44 Iomraidhean Croise  

राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे.” तेव्हा मी फार भ्यालो.


एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला;


मी दुष्ट झालो तर हायहाय करावी लागेल. मी नीतिमान झालो तरी लज्जेने व्याप्त होऊन व माझी विपत्ती पाहून मी आपले डोके वर करणार नाही.


पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस.


मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले,


कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात.


नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्‍यांची वाचा बंद पडो.


कारण मी तर पडण्याच्या बेतास आलो आहे. माझे दुःख माझ्यासमोर नित्य आहे.


लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.


हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार;


नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील; मला सोडवणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडेतुकडे करील.


हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?


हे परमेश्वरा, वैर्‍याने कशी विटंबना मांडली आहे, मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालवली आहे हे लक्षात असू दे.


तू बाळके व तान्हुली ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे; तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा ह्यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहेस.


वैर्‍यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे.


आनंदी मनाने मुख प्रसन्न होते; मनातील खेदाने हृदय भंग पावते.


तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.


मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, ह्यांसारखा तू खरोखर मला होशील काय?


तू म्हणालास, ‘हायहाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.’


हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे.


तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्‍यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत.


तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”


तू आम्हांला सर्वकाळ का विसरतोस? तू आम्हांला दीर्घकाळ का सोडून देतोस?


तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”


मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही; पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे.”


ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे.


मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत.


तो खरोखर मरणोन्मुख झाला होता; तथापि देवाने त्याच्यावर दया केली; ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.


तेव्हा दाविदाचा शौलाला अधिकच धाक वाटू लागला, आणि तो दाविदाचा कायमचा वैरी बनला.


कोणाच्या तावडीत त्याचा शत्रू सापडला तर तो त्याला सहीसलामत जाऊ देईल काय? म्हणून आज तू जे वर्तन माझ्याशी केले आहेस त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan