Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 128:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 128:2
18 Iomraidhean Croise  

तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”


जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.


सावकार त्याचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कष्टाची कमाई परके लुटोत.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


नीतिमानांविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.


परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


तू गंधसरूची शेखी मिरवतोस म्हणून तू राजा ठरशील काय? तुझा बाप खातपीत व न्यायाने व नीतीने वागत नसे काय? तेव्हा त्याचे बरे चालले होते.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2


आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती तिच्यात तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील.


तू द्राक्षमळे लावून त्यांची मशागत करशील, पण तुला द्राक्षारस प्यायला मिळणार नाही आणि द्राक्षे खुडायलाही मिळणार नाहीत; कारण कीड ती खाऊन टाकील.


तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील.


तुझा नाश होईपर्यंत तुझ्या जनावरांचे वत्स आणि तुझ्या भूमीचा उपज ते खाऊन टाकतील; तुझा संहार करीपर्यंत धान्य, नवा द्राक्षारस, तेल, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स ते तुला लाभू देणार नाहीत.


तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan