Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 प्रत्येकजण त्यांच्या शेजार्‍यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 12:2
25 Iomraidhean Croise  

युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबुलून वंशातले पन्नास हजार योद्धे आले; त्यांना व्यूहरचना चांगली करता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे.


त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत.


मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.”


मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर; त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.


त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.


मनात कपट असून आपल्या शेजार्‍यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस.


माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.


त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो; तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो; आणि बाहेर जाऊन त्या सांगतो.


त्यांच्या तोंडाचा भरवसा नाही; त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे; त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे; ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात.


त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखांतील शब्द, त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या ह्यांमुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत.


त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात; त्यांना लबाडी आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. (सेला)


जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, म्हणून बडबड करणार्‍याची संगत धरू नकोस.


दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?


जो आपल्या शेजार्‍याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो.


त्यांना असे सांग, ‘आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही ते हेच राष्ट्र आहे; सत्य नष्ट झाले आहे, ते त्यांच्या मुखांतून नाहीसे झाले आहे.


त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे; ते असत्य बोलतात; ते तोंडाने शेजार्‍याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्याच्यावर टपून असतात.


इस्राएल घराण्यात ह्यापुढे निरर्थक दृष्टान्त व खूश करणारा शकुन सांगणार नाहीत.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे; तसेच लोभाने कपटवेष धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan