Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, साहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही; मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत; विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 12:1
18 Iomraidhean Croise  

देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.


आणि मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, यइएल व अजज्या ह्यांना शमीनीथ1 सुरावर वीणा वाजवायला नेमले.


हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्‍यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत.


हे देवा, तू आपल्या नावाने मला तार; आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर;


हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस.


हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार;


दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


नीतिमान नष्ट होतो, पण ते कोणी लक्षात घेत नाही; देवभक्त प्राणास मुकतात, पण अरिष्टामुळे नीतिमान प्राणास मुकतो हा विचार कोणी करत नाही.


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


मी पाहिले पण कोणी साहाय्यकर्ता नव्हता; कोणाची अनुकूलता नव्हती म्हणून मी विस्मित झालो; तेव्हा माझ्याच बाहूने मला साहाय्य केले व माझ्या संतापाने मला आधार दिला.


यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.


परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.”


आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.


तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan