Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 118:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 माझा साहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; माझा द्वेष करणार्‍यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत. मी माझ्या शत्रूकडे विजयान्वित दृष्टीने बघेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 118:7
10 Iomraidhean Croise  

मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.


त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.


पाहा, देव माझा साहाय्यकर्ता आहे; माझ्या जिवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे.


मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पण करीन; हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन.


कारण त्याने मला सर्व संकटांतून सोडवले आहे; माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत.


माझ्यावर हल्ला करणार्‍यांपासून त्याने माझा जीव सोडवला आणि सुरक्षित ठेवला आहे; माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते.


माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.


त्यांना जिवे मारू नकोस, मारलेस तर माझ्या लोकांना विसर पडेल; हे प्रभू, तू आमची ढाल आहेस; आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांना खाली पाड.


माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत; माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत.


कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan