Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 118:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे; “परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नीतिमान लोकांच्या घरातून आनंदाच्या व विजयाच्या गीतांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत: “याहवेहच्या उजव्या भुजाने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 118:15
21 Iomraidhean Croise  

परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.


तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.


माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत.


अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.


ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती.


सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील.


कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.


देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.


परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत.


तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे.


परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे.


हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’


मग त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.


तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा; तुमच्या वेशींच्या आत राहणार्‍या लेव्यासहित आनंद करावा, कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही.


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan