Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 112:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 112:9
39 Iomraidhean Croise  

त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.


धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते.


दुर्जनांचा ध्वज मी खाली ओढीन,1 पण नीतिमानाचा ध्वज फडकत राहील.2


पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगांप्रमाणे उन्नत केले आहेस, मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे.


माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत; माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत.


सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते.


जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.


कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही;


सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नकोस; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.


शोधण्याचा समय व गमावण्याचा समय; राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो;


पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो.


जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,


तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?


अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल.


गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही.


तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.


जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्‍या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही.


आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांला सार्वकालिक वस्तीत घ्यावे.


हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”


कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावेत किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे, असे कित्येकांना वाटले.


सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि ‘घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,’ असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”


प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवत; मग ज्याच्या-त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.


पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.


देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर.


तर तुझी शेरडेमेंढरे, तुझे खळे व द्राक्षकुंड ह्यांतून उदार हस्ते त्याला दे; तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या प्रमाणात त्याला दे.


सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर म्हणजे तो आपले वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभीष्ट चिंतील; आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्त्व ठरेल.


चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे;


चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”


हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan