Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 112:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 112:8
11 Iomraidhean Croise  

परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?


माझा साहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; माझा द्वेष करणार्‍यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन.


परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.


परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.


ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.


माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.


मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल.


माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत; माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत.


परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण नीतिमानांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो.


विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan