Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 112:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 112:7
20 Iomraidhean Croise  

तर निश्‍चये तू आपले निष्कलंक मुख वर करशील; तू स्थिर होशील, निर्भय होशील;


परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?


मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.


ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.


हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन.


अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)


परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंतःकरणाचे सर्व जन उल्लास पावतील.


पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”


शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी राजाला उत्तर दिले की, “महाराज, ह्या बाबतीत आपणांला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही.


तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.


आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका; कारण ह्या गोष्टी प्रथम ‘होणे अवश्य आहे’, तरी एवढ्यात शेवट होणार नाही.”


“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.


मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.


तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”


म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan