Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 112:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 112:4
26 Iomraidhean Croise  

तुझे जीवित मध्यान्हसमयाहून तेजस्वी होईल; अंधकार असला तरी तो प्रभातेसारखा होईल.


तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल; तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल;


त्याचा दीप माझ्या शिरावर प्रकाशत असे; व त्याच्या तेजाने मी अंधकारात चालत असे;


परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.


परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.


परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे.


तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.


नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.


जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात.


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,


असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.


जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.


आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.


म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.


(कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.)


तो न्यायसंपन्न आहे हे जर तुम्हांला माहीत आहे तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हांला माहीत झाले आहे.


ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.


मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan