Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 110:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 110:3
28 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.


जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांना लोकांनी धन्य म्हटले.


परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.


पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा; हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपायमान हो.


मंदिराचा हा नियम आहे; पर्वताच्या माथ्यावरील भोवतालचा सर्व प्रदेश अत्यंत पवित्र आहे. पाहा, मंदिराचा हा नियम आहे.


ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील.


परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”


ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.


म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.


तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.


ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत.


तथापि वचन ऐकणार्‍यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.


कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्याबाबत जिवंत असे राहू.


कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.


तीताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणार्‍या देवाची स्तुती असो.


त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.


कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.


कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.


माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे. ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan