Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण परमेश्वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे; सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कारण याहवेह नीतिमान आहेत, न्यायीपण त्यांना प्रिय आहे; जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 11:7
20 Iomraidhean Croise  

तो नीतिमानांवरील आपली दृष्टी काढत नाही, तर त्यांना राजांबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापतो, व त्यांची उन्नती होते.


परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो; परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो.


मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.


त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस; तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस.


पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,


त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.


परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.


कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.


तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.


तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात.


कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.


देव न्यायी न्यायाधीश आहे; तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे.


दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.


राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे; तू सरळता प्रस्थापित केली आहेस; तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस.


दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे.


“कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे; मी त्यांना खातरीने प्रतिफळ देईन; त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन.


कारण ‘परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर आहे.’


प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.


‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan