Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील; आपल्या दाहक वार्‍याने त्यांना होरपळून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 11:6
25 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला;


मग योसेफापुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढली, पण बन्यामिनाला इतरांच्या पाचपट वाढले, आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले.


त्याच्यासाठी पाश जमिनीत गुप्त ठेवला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवला आहे.


जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेर्‍यात वास करतील त्याच्या वसतिस्थानांवर गंधक उधळतील.


असे होईल की त्याच्या पोटाची भर करण्यास देव त्याच्यावर आपला क्रोधाग्नी पाखडील; आणि तो अन्न खात असता त्याच्या क्रोधवृष्टीचा प्रवेश त्याच्या पोटात होईल.1


त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडल्या; त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले.


परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.


परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.


दुर्जनाला पुष्कळ दु:खे भोगावी लागतात; परमेश्वरावर भाव ठेवणार्‍यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते.


पाहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे; त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो; पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खातरीने गाळासकट प्यावा लागेल.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


परमेश्वर म्हणतो, हा तुझा वाटा, माझ्याकडून तुला मापून दिलेला वतनभाग आहे; कारण तू मला विसरलीस व खोट्यावर भरवसा ठेवलास.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.


मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.


सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.


परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी ‘आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन’ सर्वांचा नाश झाला.


येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल; पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”


एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे.


शमुवेलाने आचार्‍याला सांगितले, “जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितले होते तो घेऊन ये.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan