Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते; पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 11:4
28 Iomraidhean Croise  

ज्या दिवशी इस्राएल लोकांना मी मिसर देशातून बाहेर काढले तेव्हापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्‍यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे.


परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.


परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.


परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे,


हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.


कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले;


मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.


स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे.


परमेश्वर आकाशातून पाहतो; सर्व मानवजातीला तो निरखतो.


तर देवाने हे शोधून काढले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो.


तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ सत्ता चालवतो, त्याचे नेत्र राष्ट्रांना निरखून पाहतात; बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. (सेला)


सीयोननिवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा;


परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.


परमेश्वर म्हणतो, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?”


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; अगे पृथ्वी तू व तुझ्यावरील सर्व वस्तुजात ह्यांनी कान द्यावा; प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू, तुमच्याविरुद्ध साक्ष देतो,


परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो.


सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे.


आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्‍याची शपथ घेतो;


मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘ते देवाचे राजासन आहे;’


परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.


लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan