Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 11:2
18 Iomraidhean Croise  

दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत.


हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर.


माझ्या ठायी माझा आत्मा व्याकूळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे; मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे.


कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील, तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील.


अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.


दीनदुबळ्यांना पाडायला, सरळ मार्गाने चालणार्‍यांचा वध करायला दुर्जनांनी तलवार उपसली आहे व धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.


परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंतःकरणाचे सर्व जन उल्लास पावतील.


सरळ मनाच्यांना तारणार्‍या देवाने माझी ढाल धरली आहे.


कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्याविरुद्ध तो आपली तलवार पाजळतो, त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.


न्याय नीतिमानाकडे वळेल आणि सरळ मनाचे सर्व जन तो अनुसरतील.


नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे अशी त्यांनी मसलत केली.


शौल म्हणाला, “ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल, आणि पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडेल.” ह्यास्तव शौल दाविदाला म्हणाला, “ह्या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार.”


शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan