Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 109:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कारण त्या मनुष्याने दया करण्याची आठवण ठेवली नाही, तर दीन, दरिद्री व दुःखी माणसांचा वध करण्यासाठी तो त्यांच्या पाठीस लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कारण त्याने इतरांना दया दाखविली नाही, उलट गरजवंतांचा त्याने छळ केला आणि दुःखीकष्टी लोकांचा त्यांना मृत्यू येईपर्यंत पाठलाग केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 109:16
16 Iomraidhean Croise  

मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दु:ख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही म्हणून हे दु:ख आपल्यावर आले आहे.”


तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत.


परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.


दीनदुबळ्यांना पाडायला, सरळ मार्गाने चालणार्‍यांचा वध करायला दुर्जनांनी तलवार उपसली आहे व धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.


दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो.


जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan