Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 102:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे; अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 102:4
21 Iomraidhean Croise  

त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली; तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून भोजन करीना.


मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि यहोहानान बिन एल्याशीब ह्याच्या कोठडीत गेला; तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला.


“माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे; मी आपले गार्‍हाणे एकसारखे चालू ठेवीन; माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन.


माझी त्वचा काळी होऊन गळून पडत आहे; माझी हाडे तापाने जळजळत आहेत.


त्याचा जीव अन्नाला कंटाळतो, त्याच्या मनाला मिष्टान्नाचा तिटकारा येतो.


सर्वसमर्थाचे तीर माझ्या देहात शिरले आहेत, त्यांचे विष माझा जीव शोषून घेत आहे; ईश्वराकडून आलेली संकटे माझ्याविरुद्ध सज्ज झाली आहेत.


माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत; गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे.


मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे; व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत.


कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.


हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो.


निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.


मी देवाचे स्मरण करून व्याकूळ होतो; मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्च्छित होतो. (सेला)


गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत.


त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरवले आहेत.


माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे.


तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan