Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 102:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखार्‍यासारखी गळून गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत; माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 102:3
11 Iomraidhean Croise  

माझी त्वचा काळी होऊन गळून पडत आहे; माझी हाडे तापाने जळजळत आहेत.


धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.


तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे साहाय्य होत आला आहेस; हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस.


कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत; माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे, माझी हाडे जीर्ण झाली आहेत.


कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव.


दुर्जन तर नाश पावतील; परमेश्वराचे वैरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील; ते नाहीसे होतील; ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील.


तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही; माझ्या पापामुळे माझ्या अस्थींत स्वस्थता नाही;


त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.


त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे; त्याने माझी हाडे मोडली आहेत.


त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan