Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 102:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नकोस; तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 102:2
21 Iomraidhean Croise  

त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


तू माझा अपराध का क्षमा करत नाहीस? माझ्या ठायीचा दोष का घालवत नाहीस? आता तर मी धुळीत पडून राहणार तू माझा पुष्कळ शोध करशील पण मी नसणार.”


तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात.


हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?


हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्‍यांसारखा होईन.


हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.


तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.


तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे साहाय्य होत आला आहेस; हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस.


माझ्याकडे आपला कान लाव; मला सत्वर सोडव; तू माझा प्रबल दुर्ग हो; माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो.


हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.


आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नकोस; कारण मी संकटात आहे; माझे सत्वर ऐक;


हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.


तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर;


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले,


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.


परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,


मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan