Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 101:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे नजर टाकणार नाही. मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे. त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 101:3
44 Iomraidhean Croise  

“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?


मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.


निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.


जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.


मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना आपले शत्रू मानतो.


ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.


त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत.


मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.”


जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्‍यास उभा राहत नाही, तो धन्य!


जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.


पुनःपुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूला चिडवले.


तर आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले; फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले.


अहो परमेश्वरावर प्रीती करणार्‍यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो.


आपल्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजार्‍याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस.


ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”


अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो;


डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करतो, बोटांनी खुणावतो;


तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस.


परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.


मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्यासमोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभूस दूर करा.”


जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ अव्हेरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो,


तरीपण केवळ निर्दोष्यांचा रक्तपात, जुलूमजबरी व अन्याय्य धनप्राप्ती ह्यांकडे तुझे डोळे व मन लागले आहे.”


ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.


तुम्ही कोणी मनात आपल्या शेजार्‍याचे अनिष्ट चिंतू नका; खोट्या शपथेची आवड धरू नका; कारण ह्या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता?


अशा शापित वस्तूंतले काहीएक तुझ्या हाताला लागून राहू नये; म्हणजे परमेश्वर आपल्या तीव्र कोपापासून परावृत्त होऊन तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तुझ्यावर दया करील व तुझा कळवळा येऊन तो तुला बहुगुणित करील.


लक्षात ठेव, सातवे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नकोस; आपल्या दरिद्री बांधवांकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्‍हाणे केले तर तुला पाप लागेल.


परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.


म्हणून मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा, त्यापासून उजवीडावीकडे वळू नका;


कारण नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणांस दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते.


आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.


“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan