Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 101:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे— तुम्ही माझ्याकडे कधी येणार? माझ्या घरातील माझा व्यवहार मी निष्कलंक तर्‍हेने करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 101:2
22 Iomraidhean Croise  

मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे.


शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद ह्याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.


तू आपला पिता दावीद ह्याच्याप्रमाणे खर्‍या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील,


त्याने उच्च स्थाने इस्राएलातून काढून टाकली नाहीत; तथापि आसाचे हृदय सार्‍या हयातीत सात्त्विक राहिले.


आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.


तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्‍चित केली आहे.


अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.


मी तर सात्त्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर.


मी तर दीन व दरिद्री आहे; तरी प्रभूला माझी चिंता आहे; माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस.


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.


आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


अहिमलेखाने राजाला उत्तर केले, “आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रीमंडळातला आहे, दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan