Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 100:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 100:1
18 Iomraidhean Croise  

हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.


अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.


अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा; उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.


जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.


अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा.


सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील; तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.” (सेला)


राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत; कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. (सेला)


अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा; प्रभूची स्तोत्रे गा. (सेला)


अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.


सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर.


तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील.


तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,


“परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा,” असे तो पुन्हा म्हणतो.


राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan