Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 जाळीत जसा सिंह तसा तो गुप्त स्थळी टपून बसतो; दीनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तो सिंहासारखा दबा धरून बसतो; तो लाचार लोकांना पकडण्याच्या प्रतिक्षेत असतो; तो दीनांना पकडून आपल्या जाळ्यात ओढत नेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 10:9
28 Iomraidhean Croise  

ते गुहांत दबा धरून बसतात, जाळीत दडून टपून बसतात.


कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो.


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)


भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे.


माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्‍यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्‍यापासून सोडवतोस;”


दीनदुबळ्यांना पाडायला, सरळ मार्गाने चालणार्‍यांचा वध करायला दुर्जनांनी तलवार उपसली आहे व धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.


पाहा, ते माझा जीव घ्यायला टपले आहेत; हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्याविरुद्ध एकत्र जमले आहेत.


जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.


आपले धन वाढवण्यासाठी जो गरिबाला नाडतो व धनिकाला भेटी देतो तो भिकेस लागतो.


गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणार्‍या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधत फिरणार्‍या अस्वलासारखा आहे.


तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.


ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो.


कारण माझ्या लोकांमध्ये दुष्ट जन आढळतात, ते फासेपारध्याप्रमाणे दबा धरतात; ते सापळा मांडून माणसांना धरतात.


टपणार्‍या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे.


देशातील लोक बलात्कार व चोरी करतात. ते दुर्बल व दरिद्री ह्यांना चिरडून टाकतात आणि परदेशीयांवर अन्याय व जुलूम करतात.


पारध नसल्यास वनात सिंह गर्जना करतो काय? काही धरले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय?


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


तो त्या सर्वांना गळाने उचलतो, त्यांना आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांना गोळा करतो; त्यामुळे तो हर्षित व आनंदित होतो.


त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो.


ऐका, मेंढपाळांचा हाहाकाराचा शब्द होत आहे! कारण त्यांचे वैभव लयास गेले आहे; ऐका, तरुण सिंहाची थोर गर्जना होत आहे! कारण यार्देनेचे घोर अरण्य लयास गेले आहे.


जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो.


तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan