Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो; त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 गावात तो दबा धरून बसतो; गुप्तस्थळी तो निर्दोषाचे रक्त पाडतो. त्याची नजर असहाय्याची शिकार करण्यासाठी टपलेली असते;

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 10:8
14 Iomraidhean Croise  

मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदाला पाप करायला लावले, एवढेच नव्हे तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले.


खुनी मनुष्य मोठ्या पहाटेस उठून दीनदुबळ्यांचा घात करतो; रात्री तो चोर बनतो.


आता ते पावलोपावली आम्हांला घेरत आहेत; ते आम्हांला धुळीस मिळवू पाहत आहेत.


ते विधवा व उपरे ह्यांचा जीव घेतात, अनाथांना ठार मारतात.


अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस;


तरीपण केवळ निर्दोष्यांचा रक्तपात, जुलूमजबरी व अन्याय्य धनप्राप्ती ह्यांकडे तुझे डोळे व मन लागले आहे.”


त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो.


ह्यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर3 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे-दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.


पुढे लवकरच असे झाले की, तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता; तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित होते;


तेव्हा शखेमकरांनी त्याला त्रास देण्यासाठी डोंगराच्या माथ्यांवर वाटमारे ठेवले. ते त्या वाटेने आल्यागेल्याला लुटत. हे वर्तमान अबीमलेखाच्या कानी आले.


तेव्हा राजा दवेगास म्हणाला, “चल, तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड.” तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणार्‍या पंचाऐंशी पुरुषांचा त्याने वध केला.


तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुमच्याबरोबर परत येईन; तो ह्या देशात कोठेही असला तरी मी ह्या यहूदाच्या हजारो लोकांतून त्याला हुडकून काढीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan