Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 लबाडी व धमक्यांनी त्याचे मुख भरलेले आहे; त्याच्या जिभेखाली उपद्रव आणि दुष्टता आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 10:7
29 Iomraidhean Croise  

त्यांना अपकाराचा गर्भ राहून ते अरिष्टास जन्म देतात; त्यांच्या पोटात कपट उद्भवते.”


दुष्टता त्याच्या जीभेला गोड लागली, ती त्याने जिभेखाली दाबून ठेवली,


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात त्यांच्या ओठाखाली नागांचे विष आहे. (सेला)


ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.


मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर; त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.


त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.


त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत.


त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो; तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो; आणि बाहेर जाऊन त्या सांगतो.


त्यांच्या तोंडाचा भरवसा नाही; त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे; त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे; ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात.


तू आपले तोंड दुष्टपणासाठी मोकळे सोडले आहेस, तुझी जीभ कपटाची योजना करते.


अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात;


त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात; ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात.


त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखांतील शब्द, त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या ह्यांमुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत.


क्रोधाने त्यांचा संहार कर; ते नाहीसे होईपर्यंत त्यांचा संहार कर; देव याकोबावर व पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सत्ताधारी आहे अशी लोकांची खातरी होवो. (सेला)


त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात; त्यांना लबाडी आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. (सेला)


त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्त्विकाला एकान्तात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे.


पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो.


ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करतात.


असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्‍या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.


व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे.


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे; कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


जे तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आ पसरता व देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका :


अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.


Lean sinn:

Sanasan


Sanasan