Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात; तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात; तो आपल्या सर्व शत्रूंवर फूत्कार टाकतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 दुष्टाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळते; तुमच्या नियमांचा तो तिरस्कार करतो. त्याच्या विरोधकांकडे तो तुच्छतेने बघतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 10:5
23 Iomraidhean Croise  

देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.


राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे त्या देशाचे रहिवासी यबूसी ह्यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, “तुला येथे येणे साधायचे नाही; येथले आंधळेपांगळे तुला हाकून लावतील;” त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधायचे नाही.


तेव्हा इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्याकडे एक संदेष्टा येऊन म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, हा सगळा मोठा समुदाय तुला दिसतो आहे ना? पाहा, तो सर्व आज मी तुझ्या हाती देईन; मी परमेश्वर आहे ह्याची तुला जाणीव होईल.”


तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.


धनाचा लोभ धरणार्‍या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.


सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.


ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात;


त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत.


दुर्जनांचा हेवा करू नकोस, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस.


जे अन्यायाचे निर्णय करतात व जे लेखक उपद्रवकारक ठराव लिहितात त्यांना धिक्कार असो.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.


वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी; पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.


जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.


गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे; तो त्यांचा अधर्म स्मरतो; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.


त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत;


त्यांनी शेतात जाऊन द्राक्षमळ्यातील द्राक्षे खुडून व तुडवून त्यांचा रस काढला आणि उत्सव केला. आपल्या देवाच्या मंदिरात जाऊन मेजवानी केली व अबीमलेखाला शिव्याशाप दिले.


तेव्हा जबूल त्याला म्हणाला, “ज्या तोंडाने अबीमलेख कोण आहे, आणि आम्ही त्याचे अंकित का व्हावे, अशी तू बढाई मारत होतास त्याचे आता काय झाले? ज्यांना तू तुच्छ लेखलेस तेच ना हे लोक? तर आता हो पुढे आणि लढ त्यांच्याशी!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan