Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण हा दुष्ट मनुष्य स्वतःच्या दुष्ट वासनांची बढाई मारतो; तो लोभी लोकांना आशीर्वाद देतो व याहवेहची निंदा करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 10:3
40 Iomraidhean Croise  

आणि आपले जे सैन्य जायबंदी झाले तेवढ्याची घोड्यास घोडा, रथास रथ अशी भरती करा; मग आपण सपाटीवर त्यांच्याशी युद्ध करू व आपण त्यांच्यावर खातरीने प्रबळ होऊ.” त्यांची ही मसलत मान्य करून बेन-हदादाने तसे केले.


जर मी सुवर्णावर भरवसा ठेवला असता, तुझ्यावर माझी भिस्त आहे असे सुवर्णास म्हटले असते,


माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.”


तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,”


ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.


असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.


हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.


ते बडबड करतात, उद्धटपणे बोलतात, सर्व दुष्कर्मी फुशारकी मारतात;


शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट वाटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल; मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.


शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात.


एखादा नीतिमान मनुष्य नीतीचे र्आचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो; आणि एखादा दुष्ट मनुष्य अनीतीचे आचरण करीत असताही दिर्घायू होतो; हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसांत पाहिले आहे.


तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्यास? इस्राएलाचा जो पवित्र प्रभू त्याच्यावर?


त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो; पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला.


तरीपण केवळ निर्दोष्यांचा रक्तपात, जुलूमजबरी व अन्याय्य धनप्राप्ती ह्यांकडे तुझे डोळे व मन लागले आहे.”


तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल.


विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे, ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवतो त्याला धिक्कार असो.


आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”


मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’


सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते.


जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात; इतकेच केवळ नव्हे तर त्या करणार्‍यांना संमतीही देतात.


चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात.


‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.


हे पाहून परमेश्वराला त्यांचा वीट आला, कारण त्याचे पुत्र व कन्या ह्यांनी त्याला चीड आणली.


तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा;


अहो! जे तुम्ही म्हणता की, “आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,”


आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.


जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.


तो आपल्या आईला म्हणाला, “जी अकराशे चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेल्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याकडे आहेत. मीच ते घेतले होते.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो.”


शौल म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो; कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan