Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; तिने तिचे सात खांब तयार केले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 9:1
17 Iomraidhean Croise  

हे खांब त्याने मंदिराच्या देवडीजवळ उभे केले होते; उजवीकडला खांब उभा केला त्याला याखीन (तो स्थापील) हे नाव दिले होते व डाव्या बाजूला खांब उभा केला त्याला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) हे नाव दिले होते.


आणखी त्याने खांबांची एक देवडी केली होती, तिची लांबी पन्नास हात व रूंदी तीस हात होती; त्या खांबांपुढे एक देवडी केली असून सर्वांपुढे एक ओटी होती; तिला खांब होते.


ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते;


माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील,


सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते;


माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत;


ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय?


“अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैशावाचून व मोलावाचून द्राक्षा-रसाचा व दुधाचा सौदा करा!


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.


जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan