Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 8:12
16 Iomraidhean Croise  

तो नफताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता; त्याचा बाप सोरातला एक तांबट होता. पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य हे त्याच्या ठायी भरपूर होते; तो शलमोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला.


त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूंच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे ह्यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्याला मिळाले होते ते सर्व त्याने त्याला दिले.


“परमेश्वराकडून जे काही ह्या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे.” [असे दाविदाने म्हटले.]


यहूदी लोकांनी मागे वळून पाहिले तर आपल्यापुढे व मागे युद्ध होणार असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक कर्णे वाजवू लागले.


हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केलीस; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.


मग मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे;


भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे;


अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा.


हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे; त्याचा देव त्याला शिकवतो.


अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


सर्व ज्ञान व बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे.


ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.


त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan