Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, तरुणांचे मी अवलोकन केले, तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 7:7
24 Iomraidhean Croise  

व्यभिचारी मनात म्हणतो की, ‘कोणी मला पाहू नये,’ म्हणून तो दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो आपले तोंड झाकून घेतो.


तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.


परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.


“अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?


कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते;


भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे;


विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.


जो आपले शेत स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते. परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय.


भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.


भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.


आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो.


निंदकाला ताडन कर म्हणजे भोळा शहाणपणा शिकेल. समंजसाला वाग्दंड कर म्हणजे त्याला कळेल.


चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.


एकदा मी आळशाच्या शेताजवळून, बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो;


चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.


माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे,


माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;


स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो.


अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा.


ती म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते,


“जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते,


“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”


तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan