Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 7:10
11 Iomraidhean Croise  

परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?”


योरामाने येहूला पाहिले तेव्हा तो म्हणाला, “येहू, सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे ह्यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?”


येहू इज्रेलास आल्याचे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली.


ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.


“स्मरणातून गेलेल्या वेश्ये, हाती किनरी घे, शहरभर भटक, चांगले वाजव, पुष्कळ गा, म्हणजे तुझे स्मरण राहील.”


हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.


तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भीडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोती व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan