Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 5:6
12 Iomraidhean Croise  

आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली.


जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.


ज्याच्या ठायी अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते; जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यू आणतो.


जे तिच्याकडे जातात त्यांच्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत;


जारिणीचा रिवाज असा असतो : ती खाऊनपिऊन तोंड पुसते, आणि म्हणते, “मी काही दुष्कर्म केले नाही.”


आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्‍चित असोत.


मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो.


मूर्ख स्त्री गडबड करणारी असते; ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही.


त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan