Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर; ती विसरू नकोस, माझ्या तोंडच्या वचनाला पराङ्मुख होऊ नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर; माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर; माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 4:5
17 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला त्यांनीच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही.


त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले आहे; मी त्याचा मार्ग धरून आहे; त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही.


माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही.


गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही.


आमचे मन फितूर झाले नाही; आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत;


ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.


मूर्खाला बुद्धी नसता ज्ञानाची खरेदी करण्यासाठी तो हाती द्रव्य का घेतो?


जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.


जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो; ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याचे कल्याण होते.


सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.


माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत;


ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर.


अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा.


जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan