नीतिसूत्रे 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ती मला शिकवी व म्हणे, “माझी वचने तुझ्या चित्ती राहोत; तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले, “तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल. Faic an caibideil |
हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.